Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारातील जंगलात मंगळवारी (दि.२३) रात्री ९ वाजेच्या सुमारास साधारण ५५ ते ६० वयोगटातील अनोखळी पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
त्याचे अंगात पिवळ्या रंगाचे हाफ बाही असलेले बनियान व नाडी असलेली अंडरवेअर आहे. उजव्या हातात कापडी ताईत बांधलेला आहे. मृतदेह कुटीर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
या संदर्भाने कुणाला अधिक माहिती असल्यास अथवा मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष येऊन अथवा फोनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांनी केले.