वाढत्या चोऱ्यांबाबत मंत्रालयातील गृह विभागात बैठक घेणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर : शहरातील वाढत्या चोऱ्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयातील गृह विभागात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. महापालिकेत काल सोमवारी (दि.२) पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, शहर विकास आराखड्यातील रस्ते तयार करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

रस्त्यांबरोबरच सीना नदीचे सुशोभीकरण व नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्यावरही भर देण्यात येत आहे. शहरात विकासकामे वेगाने होणे आवश्­यक आहे. राज्य शासनाकडून ग्रामीण रस्तेविकास योजनेअंतर्गत निधी मिळाला आहे.

यातून तपोवन रस्ता, सोनेवाडी रस्त्याचे काम केले जाईल. शहरातील रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांवरील भुयारी गटार, पाईपलाइन आदी कामे लवकर करून नव्याने रस्ते तयार करण्यात येणार आहेत.

शहरातील वाढत्या चोऱ्यांच्या प्रश्­नाबाबत लवकरच मंत्रालयातील गृह विभागात बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24