अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शिर्डीकडे निघालेल्या गुजरातमधील बसची (जीजे १८ झेड ४१११) शुक्रवारी रात्री धडक बसून मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. अन्य एकजण जखमी झाला.
खिर्डी गणेशफाट्याजवळ बजाज डिस्कव्हरला (एमएच १७ एटी ७५५१) बसची धडक बसून सचिन ज्ञानदेव भिंगारे (३४, राहणार करंजी, तालुका कोपरगाव) यांचा मृत्यू झाला.
प्रकाश पुंजा वाणी (नांदुर्खी, तालुका राहाता) हे गंभीर जखमी झाले. अपघात होताच बसचालक पळून गेला.