किरकोळ कारणावरून झाले भांडण एकाने गमविला जीव !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :-राहुरी शहरात किरकोळ कारणावरून दोघात झालेल्या भांडणातून संजय थोरात या ५५ वर्षीय इसमाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.या घटनेतील आरोपी विशाल लांडे याला राहुरी पोलीसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.

शनिवारी सायंकाळी शनिचौक परिसरात हाणामारीची ही घटना घडली. विशाल संभाजी लांडे वय २६ राहणार राहुरी शहर हा तरुण शनीवारी सायंकाळी शहरातील स्टेशन रोड परिसरात मावा घेण्यासाठी थांबला होता.

यावेळी संजय थोरात वय ५५, राहणार वडगाव गुप्ता हे घटनास्थळी आले.यावेळी दोघात शाब्दिक चकमक होऊन एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

विशाल लांडे याने संजय थोरात यांना काठीने मारहाण केल्याने थोरात यांचा गंभीर जखमी झाले. घटनेची मिहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख,सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन बागुल उपनिरीक्षक यशवंत राक्षे,

पोलीस उप निरीक्षक निरज बोकिल, पोलीस नाईक प्रविण खंडागळे, आदिनाथ पाखरे, सागर माळी आदि पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी संजय थोरात यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र सहाय्यक वैद्यकीय अधिकारी संदिप आठरे उपचारापूर्वीच थोरात मयत झाल्याची माहिती सहाय्यक वैद्यकीय अधिकारी संदिप आठरे यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24