विषारी दारू पाजून मारहाण केल्याने एकाच मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- बळजबरीने विषारी दारू पाजून चौघांनी जबर मारहाण केल्याने जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

माझी बकरी मेलेली असून ती तुम्हाला देतो, असे सांगत रमेश काळे व त्याची पत्नी वंदना या दोघा पती पत्नीस मोटारसायकलवर बसून कटवणात आणले. येथे रमेश याला जावेद रौफ शेख (रा. मोईन गल्ली भिंगार ) व त्याचे ३ अनोळखी साथीदारांनी आणलेली विषारी दारू बळजबरीने पाजून मारहाण केली.

या मारहाणीत त्याला जबर मार लागल्याने त्यास नगर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार चालू असतांना रमेश याचा मृत्यू झाला. या बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश याचे शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रमेश याचा मारहाणीत जबर मार लागल्याने बळजबरीने दारू पाजल्याने तसेच त्या दारूमध्ये विषाचे अंश आढळून आल्याबाबतचा अहवाल दिला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24