शेतात असताना अचानक समोर आला बिबट्या,हृदयविकाराचा झटका आल्याने महिलेचा मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतात काम करत असताना अचानक बिबट्याला पाहून हृदयविकाराचा झटका आल्याने एका ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील जाखोरी शिवारात शनिवारी घडली आहे. शीलाबाई लहानू पानसरे असे मृत महिलेचे नाव आहे.

हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार …

शीलाबाई शनिवारी सायंकाळी आपल्या शेतात नेहमी प्रमाणे काम करत होत्या. त्यांना अचानक त्याच्या समोर बिबट्या दिसला. अचानक समोर बिबट्याचे दर्शन झाल्याने घाबरून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत तत्काळ वनविभागाला कळवण्यात आले.

हे पण वाचा :- जत्रा पाहायला गेलेल्या चार अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्कार

घटनेची माहिती मिळताच संगमनेर भाग १ चे वनक्षेत्रपाल निलेश आखाडे, वनरक्षक एस. आर. पाटोळे यांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत मयताच्या कुटुंबियांना वनविभागाकडून मदत मिळण्याची मागणी केली आहे.

हे पण वाचा :- कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एक मुलीच्या अंगाला स्पर्श, प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24