कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘या’ शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- जामखेड कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेड शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी सोमवारी दिली.

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १७ झाली आहे. सर्व शहर एका कंट्रोल अंतर्गत आणले असून कोणीही बाहेरचा व्यक्ती येणार नाही व शहरातील व्यक्ती बाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

आतापर्यंत १८५ जणांच्या चाचण्या केल्या. १७ पाॅझिटिव्ह आले आहेत. यातील सहा रूग्ण बरे झाले आहेत.

लाॅकडाऊनच्या सूचनांचे पालन करा, हाॅटस्पाॅट असलेल्या भागात घराबाहेर व रस्त्यांवर औषधांची फवारणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी शहरातील ज्या भागात जास्त रूग्ण आढळून आले, त्या नुराणी काॅलनीला भेट दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24