थायलंड :- पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बेटावरील एका धबधब्याजवळ सेल्फी घेण्याच्या नादात पाय घसरून पडल्याने गुरुवारी एका फ्रेंच पर्यटकाचा मृत्यू झाला.
थायलंडमधील कोह समुई बेटावरील प्रसिद्ध ना मुआंग-२ या धबधब्यावर ३३ वर्षीय फ्रेंच पर्यटकाचा सेल्फी घेताना खाली पडून मृत्यू झाला. हा धबधबा निसरडा व जास्तच सरळ असल्याने पीडित पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यास बराच वेळ लागला.
फ्रेंच पर्यटकाचा मृत्यू झाला त्या भागातच यापूर्वी गत जुलै महिन्यात एका स्पेन पर्यटकाचा मृत्यू झाला होता. या धोकादायक भागात पर्यटकांनी जाऊ नये, यासाठी तो भाग बंद केला असून, तिथे धोक्याचा इशारा देणारे फलक लावण्यात आल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली.