अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून यामुळे अपघाताचे सत्र देखील सुरूच होते. पारनेर तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था देखील नेहमीच चर्चेत असते.
या रस्ता दुरुस्तीसाठी अनेकवेळा आंदोलने झाली आहे. प्रशासन मात्र याबाबत गंभीर नाही असे दिसून येत आहे. याचमुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत कुरुंद ते अळकुटी या मार्गावर जवळपास 50 जागृती फलक लावून यावर वाहने सावकाश चालविण्याबाबत संदेश दिला गेला आहे.
खड्डे सौजन्य पी डब्लू डी अश्या प्रकारे प्रशासनाला यासाठी जबाबदार धरले आहे . या बाबतचे फलक अचानक सगळीकडे दिसू लागल्याने पारनेर परिवर्तनाच्या या उपक्रमाची चर्चा पूर्ण तालुक्यात झाली. जोपर्यंत पारनेर तालुका पूर्णतः खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत परिवर्तन चे आंदोलन सुरू राहील.
पुढील काही दिवसात गाढव धिंड, खड्यात सत्यनारायण महापूजा आणि वेळप्रसंगी धरणे आंदोलन परिवर्तन तर्फे केले जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.
अनेकदा या बाबत विनंती केली, निवेदने दिली पण संबंधित अधिकारी या गोष्टीबाबत गंभीर नाही आहे असे दिसून येत आहे. या रस्त्यांची ऑडिट होणे गरजेचे आहे आणि भ्रष्ट अधिकारी किंवा जे कुणी या दुरावस्थेस जबाबदार असतील त्यांची जागा तुरुंगात आहे अशी प्रतिक्रिया फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved