अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : कोरोनाने अवघ्या जगला वेड लावले आहे. यात अनेकांचे संपूर्ण जीवन बदलून टाकले आहे. कोरोनाने संपूर्ण आर्थिक घडी विस्कटून गेली आहे.त्यामुळे चोरट्यांनी देखील चोरीची नवीन पद्धत शोधली आहे.
चोर आता रोख रक्कम चोरण्याऐवजी किमती माल चोरून तो विकत आहेत. असा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे.
संगमनेर तालुक्यातील माळवदवाडी (आंबी खालसा) येथील एका शेतकऱ्याचा डाळिंब बागेतून चोरट्यांनी शुक्रवारी सुमारे दीड लाख रूपयांचे डाळिंब चोरून नेले. संदीप भाऊसाहेब डोके यांच्या बागेत ही चोरी झाली आहे.
शनिवारी सकाळी चोरी झाल्याचे डोके यांना समजले. त्यांनी बागेत जावून पहिले असता झाडाला लागलेले डाळिंब चोरट्यांनी चोरून नेले. या घटनेची माहिती त्यांनी घारगाव पोलिसांना दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असून डाळिंब चोरी प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी देखील संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा शेतीमाल चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews