अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करताना हलगर्जीपणा करणाऱ्या कोरोना सुरक्षा समितीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसीलदार ज्योती देवरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तींचे सक्तीने संस्थात्मक विलगीकरण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यासाठी सरपंच, ग्रामसेवक व तलाठी अशी प्रत्येक गावात त्रिस्तरीय समिती तयार करण्यात आली असून
नव्याने आलेल्या व्यक्तींची नोंद घेऊन त्यांचे विलगीकरण करणे, त्याची माहिती वरिष्ठांना देणे, एखाद्या व्यक्तीस त्रास होऊ लागल्यास वैद्यकीय तपासणी करणे या प्रमुख जबाबदाऱ्या समितीवर आहेत.
नुकतेच बाभुळवाडे व पिंप्रीपठार या दोन गावांमध्ये कोरोनाची बाधा झालेले मुंबईवरून आलेले रुग्ण आढळले. बाभुळवाडे येथील नागरिकास संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याची जबाबदारी सुरक्षा समितीची होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews