ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : बसमध्ये तरुणाची फाशी घेऊन आत्महत्या !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar Breaking : शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात उभ्या असलेल्या एका बसमध्ये कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवार दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की शिर्डी पोलिसांनी जप्त केलेली एक बस शिर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात साईबाबा संस्थान भोजनालय रोडवर उभी आहे. या बसमध्ये कोळपेवाडी स्थितीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.

सोमवारी सकाळी ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी बसचा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. शिर्डी पोलीस स्टेशन कर्मचारी शेख व दळवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर तात्काळ शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह राहाता येथे पाठवून दिला.

घटनास्थळी तपासणी केली असता एक चिठ्ठी मिळून आली. त्यात असलेल्या नंबरवर संपर्क केला असता, मृतदेहाची ओळख पटली. आत्महत्येच्या कारणांचा खुलासा अद्याप झालेला नाही.

अधिक तपास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट करीत आहेत. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office