अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-प्राप्तिकर विभागाने उत्तर भारतातील प्रसिद्ध पशुखाद्य उत्पादकांच्या अनेक ठिकाणी छापे टाकून 52 लाख रुपयांचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) काल उशिराने ही माहिती दिली. सीबीडीटीने सांगितले की, 18 नोव्हेंबर रोजी कानपूर, गोरखपूर, नोएडा, दिल्ली आणि लुधियाना या ठिकाणी 16 ठिकाणी छापे टाकण्यात आले.
यामध्ये 121 कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न सापडले. यात अनेक धक्कदायक गोष्टी उजेडात आल्या. या व्यावसायिकांनी अनेक कोटींचे फ्रॉड कर्जही घेतले आहे.
तसेच ज्या व्यवसायांवर कर्ज घेतले आहे ते व्यवसाय केवळ कागदावरच असून अस्तित्वात काहीच नाही. सीबीडीटीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
“आतापर्यंत 52 लाख रुपयांचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उरलेल्या दागिन्यांच्या स्त्रोतांची पडताळणी केली जात आहे.
”सीबीडीटीने सांगितले की, सात लॉकरही असल्याचे आढळून आले आहे त्यांचा शोध अद्याप लागला नाही. तसेच 1.30 कोटींची रोकडही सापडली असून त्याची पडताळणी केली जात आहे.
या ग्रुपला दिल्लीतील काही कंपन्यांकडून असुरक्षित कर्ज म्हणून 100 कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच, त्यात संलग्न असलेल्या चिट फंड कंपनीला अज्ञात स्त्रोतांकडून कोट्यवधी रुपयांचे असुरक्षित कर्ज मिळाले होते.
मुखवटा कंपन्यांकडून (Shell companies) कर्ज :- सीबीडीटीने सांगितले की छाप्यादरम्यान असे दिसून आले की या मुखवटा कंपन्यांकडून (Shell companies) या ग्रुपने कर्ज घेतले आहे,
तो ग्रुप फक्त कागदावर आहे आणि त्यांचा कोणताही खरा व्यवसाय नाही. कंपनीच्या एका डायरेक्टरचा टॅक्सी ड्रॉयव्हरचे 11 बँक खाती आहेत. त्यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात पैशांची हेराफेरी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved