अबब! ‘ह्या’ तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस ; झालेय ‘असे’ काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, सोनेवाडी ,पोहेगाव, डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी आदी परिसरात जोरदार पाऊस पडला.

तालुक्यातील काल झालेल्या वादळी पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. सोनेवाडी नगरवाडी परिसरातील पावसाचे वाहुन आलेले पाणी व चांदेकसारे येथे झालेल्या अतिवृष्टीने काही घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. काल गुरुवारी झालेल्या पावसाचे

पोहेगाव, सोनेवाडी, चांदेकसारे, घारी, डाऊच खुर्द ,जेऊर कुंभारी अदी परिसरात दाणादाण उडूवून दिली. सतत दोन तास ढगफुटी झाल्या सारखा पाऊस पडत होता. पावसामध्ये वार्‍याचेही प्रमाण असल्याने सोनेवाडी पोहेगाव चांदेकसारे परिसरातील मका व ऊस शेतीचे नुकसान झाले.

या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले. तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले.

परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. सुरुवातीला जोमात आलेले कपाशीचे पीक आता मोठ्या प्रमाणात पाते गळू लागल्यामुळे धोक्यात येऊ लागले आहे. या पावसामुळे झाडांची खालची पाने लालसर-पिवळी पडू लागली आहेत.

कपाशीवर मावा-तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी कपाशीचे पीक पाण्यात डुंबत होते. उसाचे पिक जमिनीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.डाऊच खुर्द परिसरातही मका, सोयाबीन पिकांमध्ये अतिवृष्टीचे आलेले पाणी घुसल्याने सदर पिके जमीनदोस्त झाली आहेत.

सरपंच संजय गुरसळ यांनी सदर परिस्थिती बघून या पिकांचे नुकसानीचे पंचनामे व्हावे म्हणून मागणीही केली आहे. सोनेवाडी येथे वादळी पावसाने गावात वीज पुरवठा करणार्‍या पोलच्या तारेवर झाड उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24