अबब! ‘ह्या’ तालुक्यात कोरोनाह कहर; एका दिवसात 101 पॉझिटिव्ह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

श्रीरामपूर तालुक्यात एका दिवसात रुग्णांनी शंभरी गाठली. तालुक्यात एकूण 1434 रुग्णसंख्या झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये काल एकूण 63 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली.

यात 34 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्हा रुग्णालयात 9 तसेच खासगी प्रयोग शाळेत 58 असे सर्व मिळून कालच्या दिवशी 101 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आले आहेत.

अद्याप 36 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. दरम्यान, शहरातील एका शाळेच्या 55 वर्षीय मुख्याध्यापकाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे.

55 वर्षीय मुख्याध्यापकाला 6 तारखेला त्रास होवू लागल्याने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नगर येथील एका खासगी रुगणालयात दाखल करण्यात आले.

काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 3150 जणांची चाचणी करण्यात आली असून यात आतापर्यंत 1434 पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24