अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : सलग २० व्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्याने आता पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आता महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
आधीच कोरोनाने आर्थिक कणा मोडला असताना आता सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. आज नव्याने पुन्हा डिझले 17 तर पेट्रोल 21 पैशांनी महाग झालं आहे. 20 दिवसामध्ये डिझेलच्या किंमतीत तब्बल 10 रुपयांनी तर पेट्रोल ९ रुपयांनी महागलं आहे.
नव्या दरानुसार दिल्लीत पेट्रोल 80.13 रुपये प्रति लिटर तर डिझेल- 80.19 रुपये लिटर झाले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल- 86.91 रुपये प्रति लिटर तर डिझेल- 78.51 रुपये लिटर, कोलकातामध्ये पेट्रोल- 81.82 रुपये प्रति लिटर तर डिझेल- 75.34 रुपये लिटर झाले आहे.
तुम्ही सुद्धा जाणून घेऊ शकता दर, त्यासाठी करा ‘हे’ – देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात.
नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. त्याच वेळी, आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता.
आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews