संगमनेर: तळेगाव दिघे येथील अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेऊन अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी सोनू ऊर्फ सुधीर संपत मोकळ याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
मुळानगर (ता. राहुरी) येथील रहिवासी व सध्या तळेगाव दिघे येथे मोलमजुरीसाठी राहणाऱ्या महिलेची मुलगी ५ डिसेंबरला सकाळी शौचास जाते असे सांगून घरातून बाहेर गेली, ती पुन्हा परतली नाही.
कुणीतरी मुलीस पळवून नेल्याच्या आईच्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सोमवारी मुलीने आई व मामासमवेत पोलिस ठाण्यात येऊन सोनू मोकळ याने ‘तू जर माझ्याशी लग्न केले नाहीतर मी जीव देईन,’ अशी धमकी देत पळवून नेऊन अत्याचार केल्याचा जबाब दिला.
मोकळ याने मुलीस ठाणे येथील त्याच्या खोलीवर, तसेच कोपरगाव येथे मित्राच्या मेव्हण्याच्या घरी नेऊन अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. या प्रकरणी आरोपी सोनू यास पोलिसांनी अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.