अहमदनगर ब्रेकिंग : मतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अकोले : मतिमंद अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस पालघर जिल्ह्यातील वसई पूर्व येथील रमेश हरिभाऊ निंबाळकर याच्याविरुद्ध अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोल्यातील एका मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील पिडीत मुलगी आईवडिल कामासाठी बाहेर गेलेले असताना घरी एकटीच रहात असे. एक दिवस घरातील मंडळींनी तिचे पोट वरती दिसत असल्याने तिची प्रवरा रुग्णालयात तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर तिच्या आईवडिलांनी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली. यानंतर अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांच्याकडे या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली. पिडीत मुलगी ही त्या आरोपीचे नाव सांगण्यास असमर्थ होती.

मग ढोमणे यांनी यातील तज्ज्ञ शिक्षकांना पाचारण करून त्या पिडीत मुलीचा जबाब नोंदविला. त्यामध्ये तिने सांगितले की, मुंबईचा चालक हा दूध भरण्यासाठी संघात येतो. त्याला वडील ओळखतात. त्याने माझ्याशी घरात कोणी नसताना बळजबरी करून पाच ते सहा वेळा अत्याचार केला, असे सांगितले.

तिचे आईवडील व साक्षीदार यांना विचारपूस केली असता निंबाळकर नावाचा व्यक्ती मुंबईवरून येत असतो. टँकर भरेपर्यंत तो आमच्या घरी जेवण करण्यासाठी तसेच घरासमोरील झाडाखाली झोपण्यासाठी येत असे. त्यानेच आमच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, अशी खात्री झाली.

यानंतर अकोले पोलिसांनी आरोपी रमेश हरिभाऊ निंबाळकर याच्याविरुद्ध गु. र. नं. ३३९/२०१९ नुसार भा. दं. वि. कलम ३७६ (जे)(एल) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24