अहमदनगर :- नगर-पुणे महामार्गावर नगर तालुक्यातील चास गावाजवळ मोटारसायकलवरील दोघांना वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चास गावाजवळून दोन तरुण मोटरसायकलवरून जात होते. भरधाव मोटारसायकल डिव्हायडर तोडून रस्त्याच्या दुसऱ्य़ा बाजूला गेली.
त्याचवेळी आलेले एक भरधाव वाहन दोघांच्या अंगावरून गेले. दोघे जागीच ठार झाले. दोघेही तरुण २० ते २५ वर्षाच्या वयोगटातील आहे.