अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील माहुली घाटानजीक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला.
अज्ञात वाहनाने दिलेल्या धडक दिल्याने विवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात घडला.
एकनाथ नामदेव मोहिते (वय ५०, रा. जांबुत बुद्रुक, ता.संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हा दुचाकीस्वार नाशिक-पुणे महामार्गाने संगमनेरच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.
दुचाकी महामार्गाच्या खाली जाऊन गटारीत जाऊन आदळली.
मोहिते यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
नागरिकांनी घारगाव पोलीस ठाण्याला ही माहिती दिली.
याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com