अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर: तालुक्यातील तळेगाव दिघे येथील एका १६ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेवून बळजबरीने अत्याचार केला. याप्रकरणी आरोपी सोनू उर्फ सुधीर संपत मोकळ (वय २१, रा. पारेगाव खुर्द) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील एका महिलेची अल्पवयीन मुलगी दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शौचास जाते, असे सांगून घरातून बाहेर गेली. ती पुन्हा घरी परतली नव्हती.
कुणीतरी आपल्या मुलीस पळवून नेल्याच्या आईच्या फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आई व मामा समवेत येवून सोनू उर्फ सुधीर संपत मोकळ (वय २१, रा. पारेगाव खुर्द) याने आपणास ‘तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर मी जीव देईन’, अशी आईच्या मोबाइलवर धमकी देत पळवून नेवून दि. ५ ते दि. १५ डिसेंबर २०१९ या काळात बळजबरीने अत्याचार केल्याचा जबाब पोलिसांना दिला.
आरोपी मोकळ याने सदर मुलीस ठाणे येथील त्याच्या खोलीवर नेवून तसेच कोपरगाव येथे मित्राच्या मेव्हण्याच्या घरी नेवून, स्वत:च्या हातावर चाकूने मारून घेवून बळजबरीने अत्याचार केल्याचा जबाब पीडित मुलीने नोंदविला.
त्यानुसार दाखल गुन्ह्यात भा. दं. वि. ३६६ (अ), ३७६ (२), (एन) व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम ४ व ६ प्रमाणे वाढीव कलम नोंदविले. अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपी सोनू उर्फ सुधीर संपत मोकळ यास पोलिसांनी अटक केली आहे.