Ahmednagar Breaking : शहरातील तपनेश्वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना मिळताच पोलिसांनी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला असता,
त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेलसमोर तीन आरोपी बसलेले दिसले, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना पोलीस व आरोपी यांच्यामध्ये झटापट झाली, या वेळी दोन पोलीस किरकोळ जखमी झाले, यादरम्यान एका आरोपीने पिस्टलमधून पोलिसावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.
या वेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या ‘पायावर गोळीबार करून तीनही आरोपी ताब्यात घेतले. जखमी आरोपाला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत जामखेड पोलीसात पोकॉ. संतोष नामदेव कोपनर यांनी दिलेल्या फिर्यादत म्हटले आहे की, दि. १९ रोजी दहाच्या चे सुमारास आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, शुभम बाळासाहेब पवार,
काकासाहेब उत्तम डुचे सर्व (रा. सारोळा ता. जामखेड ) यांनी जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथे अदनान जहर शेख, (रा. तपश्वररोड, जामखेड, ता. जामखेड ) यांच्या डोक्याला पिस्टल लावुन त्याच्या ताब्यातील इटिंगा गाडी (एमएच १रकेटी ४७९५) ही जबरीने चोरून नेली.
आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, शुभम बाळासाहेब पवार व काकासाहेब उत्तम डुचे यांचा शोध घेत असताना हॉटेल साईसमोरील मोकळ्या पटांगणात आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार याने पिस्टल बाहेर काढुन पोलिसांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने पिस्टलमधून गोळी फायर करण्याचा प्रयत्न केला.
पिस्टलमधील गोळी फायर झाली नाही, त्याचे वेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार व त्याच्या साथीदारांना पिस्टल खाली टाकण्याचे आवाहन करूनही पिस्टल खाली टाकले नाही. उलट पोलिसांशी झटापट करून मारहाण केली.
या वेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षनार्थ आरोपी प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार याच्या दिशेने झाडलेली गोळी त्याच्या उजवे पायावर लागल्याने तो जखमी झाला. पोलीसांनी वरील सर्व तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वतःहाचा जीव धोक्यात घालून अट्टल गुन्हेगार असलेल्या सर्व आरोपींना अटक केली आहे.