अहमदनगर ब्रेकिंग : धनादेश वटला नाही म्हणून आरोपीस कारावास !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar Breaking : आश्वी येथील श्री गजानन महाराज शुगर लि. कौठेमलकापुर या कंपनीला दिलेला धनादेश वटला नाही म्हणुन संगमनेर न्यायालयाने आरोपीस नुकतीच कारावासाची शिक्षा दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्री गजानन महाराज शुगर लि. भक्तनगर, कौठेमलकापुर (ता. संगमनेर) यांनी शांताराम दामु गवांदे ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार यांच्याविरुद्ध संगमनेर न्यायालयात तक्रार दाखल केलेली होती.

ऊस तोडणी वाहतुकीपोटी अॅडव्हान्स रक्कम घेवुनही गवांदे कामावर आलेले नाहीत. कारखान्याने त्यांना दिलेली अॅडव्हान्स रक्कम भरणा करण्यास सांगुनही व वेळोवेळी कळवुनही सदरची रक्कम त्यांनी भरणा केलेली नाही.

कारखान्याचे शेतकी खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी त्यांची समक्ष भेट घेवुन रक्कम भरणा करण्यास सांगितले असता त्यांनी कारखान्यास रक्कम भरणापोटी धनादेश दिलेला होता. व रक्कम भरणा करण्याचे मान्य केले होते.

फिर्यादी कंपनीने सदरचा चेक बँकेत भरणा केला परंतु तो न वटता परत आला. त्यानंतर कंपनीने आरोपी शांताराम गवांदे याच्या विरोधात संगमनेरच्या चीफ ज्युडी. मॅजीस्ट्रेट यांच्या न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आलेली होती.

सदर फिर्यादीमध्ये कारखान्याची अशी तक्रार होती की, शांताराम दामु गवांदे याने गळीत हंगाम सन २०१७- १८ मध्ये युटेक शुगर लि. या कंपनीकरीता ऊस तोडणी व वाहतुक करुन कारखाना कार्यस्थळावर पोहचवण्याचा ठेका घेतला होता.

व तसा लेखी करारनामा कारखान्याच्या लाभात लिहुन दिलेला होता. कारखान्याकडून ऊस तोडणी मजुरांना देण्यासाठी रक्कम ३ लाख अॅडव्हान्स म्हणुन घेतलेली होती.

या खटल्याचा निकाल होवुन आरोपी शांताराम दामु गवांदे याला न्यायालयाने भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायदा १३८ अन्वये फौजदारी प्रक्रीया संहितेचे कलम २५५ (२) अन्वये दोषी ठरवत एक वर्षाची कारावासाची शिक्षा व रक्कम ३ लाख १० हजाराचा दंड तसेच दंडाची रक्कम न भरल्यास आणखी चार महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दंडाच्या रक्कमेतून कंपनीच्या धनादेशाची रक्कम कंपनीला परत करावयाची आहे.

दरम्यान, न्यायाधीश गिरी यांच्यासमोर खटल्याचे कामकाज सुरु होते. साखर कारखान्याचे वतीने सदर खटल्याचे कामकाज अॅड. श्रीकांत एच. गोंगे यांनी चालवले. न्यायालयासमोर गवांदे यांनी वादातील धनादेश दिल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले आहे.