अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सातारा दौऱ्यावर असून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर बोलताना म्हणाले की, चांगला कारभार कर, नांदा सौख्य भरे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आकस आणि पोटशूळ आहे.
ज्यांनी राज्याचे 5 वर्ष या राज्याचे नेतृत्व सक्षमपणे केले हे काही लोकांना पचनी पडले नाही. त्यांच्यावर कोणतेही आरोप करता येत नाहीत.
यासाठी त्यांची छबी बदनाम करण्यासाठी त्याठिकाणी खडसेंचा गेम करून राष्ट्रवादीमध्ये घेतल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी साताऱ्यात केला आहे.
केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांना तपासासाठी आता यापुढे राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, याविषयावर बोलताना दरेकर म्हणाले, राज्य सरकार आणि केंद्र सरकार संघर्ष उभा करणे.
या लोकशाहीमध्ये योग्य नाही. नाहीतर वेगळा संघर्ष त्या ठिकाणी उभा राहील. अशा पद्धतीचा निर्णय योग्य नसल्याचे दरेकर म्हणाले. तसेच मुख्यमंत्री सोलापूर आणि उस्मानाबादला आल्यावर त्यावेळेस काहीतरी घोषणा करतील असे वाटले होते.
अजून दोन दिवसांत त्यांनी काहीतरी घोषणा करावी अशी अपेक्षा आहे. हा विषय आम्ही राजकीय दृष्टीतून पाहत नाही. अशा वेळेत शेतकऱ्यांना एकाबाजूला दीर्घकाळ उपायोजना तर दुसऱ्या बाजूला तत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
फडणवीस सरकारच्या काळात ओला दुष्काळाच्या काळात स्वतंत्र जीआर काढला असल्याचे मत यावेळी प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved