‘त्या’ पतसंस्थेमधील संचालक मंडळावर कारवाईची टांगती कुर्‍हाड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर परिसर उद्योग समूह पगारदार सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मध्ये 2015- 2020 या कालावधीसाठी निवडून आलेले संचालक मंडळ व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात लाखो रुपये इतर अ‍ॅडव्हान्स म्हणून उचलले होते.

याप्रकरणी चालू असलेल्या प्रकरणात चौकशासाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी यांचा अहवाल सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांनी फेटाळला आहे. त्यामुळे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यावर कारवाईची टांगती कुर्‍हाड कायम आहे.

या संस्थेमध्ये 2015- 2020 या कालावधीसाठी निवडून आलेले संचालक मंडळ व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात लाखो रुपये इतर अ‍ॅडव्हान्स म्हणून उचलले होते. या संस्थेतील संचालक शांतवन सोनवणे यांनी संचालक मंडळाच्या मासिक मिटिंग मध्ये वारंवार इतर अ‍ॅडव्हान्स भरणेकामी आवाज उठवला होता.

या अनुषंगाने दि. 12 मार्च 2020 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांनी संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 अन्वये चौकशी आदेश पारित केला होता, त्या अनुषंगाने दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी प्राधिकृत अधिकारी अ‍ॅड. अरविंद मुळे अहमदनगर यांनी वरील प्रस्तुतप्रकरणी अहवाल सादर केलेला आहे.

चौकशी अहवाल सोबत सन 2017-18 व सन 2018- 19 या कालावधीची ऑडिट मेमो प्रती जोडलेल्या आहे. त्यानुषंगाने वरील मुद्यांची अवलोकन करून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रीरामपूर यांनी दि. 15 ऑगस्ट 2020 रोजीच्या संचालक मंडळाला क्लिनचीट देणारा सादर केलेला .

अहवाल मोघम स्वरूपाची असल्याने अमान्य करण्यात आल्याने वरील प्रकरणी संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यावर कारवाईची टांगती कुर्‍हाड कायम आहे

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24