अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यात मुंबई-पुणे कनेक्शन मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून जर कोणी चोरून-लपून येत असेल, त्यांच्यावर कारवाई करा, आशा सूचना नगर विकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनास दिल्या आहेत.
राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी या सुचना केल्या. यामुळे आता विनापरवाना येणाऱ्या नागरिकांना येता जाता परवानगी घ्यावी लागेल.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews