अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते सनी देओल गेल्या काही दिवसांपासून कुल्लूमध्ये राहत होते.
कुल्लूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि त्याचे मित्र मुंबईला जाण्यासाठी नियोजन करत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहेत.
अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.
सनी देओल यांच्यावर मुंबईत काही दिवसांपूर्वी खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते आपल्या मनातील कुल्लूमधील फार्महाऊसवर राहायला गेले होते. सध्या सनी देओल यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved