अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह आयोजित निवारा महोत्सवाचे रविवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. निवारा बालगृह समता भुमी, मोहा फाटा, बीड रोड, जामखेड येथे आयोजन करण्यात आले असल्याची
माहिती ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक डॉ. अरुण जाधव यांनी दिली. यावेळी निर्मलग्राम पाटोदा (जिल्हा औरंगाबाद) चे माजी सरपंच व प्रबोधनकार भास्करराव पेरे पाटील यांचे ‘गाव सेवा हीच खरी सेवा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
तसेच सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, दिवंगत लोक कलावंत हिराबाई जाधव स्मृती सांस्कृतिक पुरस्कार वितरण, लोककलावंतांचा सत्कार, मनोरंजनातून प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी होणार आहे.
ग्रामीण विकास केंद्राचे जेष्ठ विश्वस्थ प्रा. डॉ. बाळासाहेब बळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास अनेक जण उपस्थित राहणार आहे.
यावेळी निर्मलग्राम पाटोदया चे सरपंच भास्करराव पेरे पाटील व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते जामखेड मधील पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.