अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : भारतीय सैनिकांच्या घरातील महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या व लष्कराच्या वर्दीची विटंबनेचे दृश्य, दाखवून समाजात विकृती पसरविणाऱ्या फिल्म निर्माती एकता कपूर हिच्या प्रतिमेला जोडे मारुन माजी सैनिकांनी निषेध केला.
तसेच एकता कपूर हिच्यावर गुन्हा दाखल करून, या वेब सिरीजवर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली. तपोवनरोड येथे मंगळवारी हे आंदोलन करण्यात आले.
तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या माजी सैनिकांनी दिला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews