अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- मुसळधार पावसामुळे मुळा धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. महापालिकेने जलशुद्धीकरण केंद्रात तुरटी व क्लोरिनची मात्रा वाढवली आहे.
तथापि, गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाणी उकळूनच प्यावे, असा सल्ला महापालिकेने दिला आहे. जलशुद्धीकरण प्रक्रियानंतरही गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले.
जलजन्य आजार होण्याचा धोका असल्याने पाणी उकळूनच घ्यावे, असे आवाहन महापाैर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले. नळांना तोट्या बसवण्याचेही आवाहनही मनपाने केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved