अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-शिर्डी जवळील नांदूरखी पाटावर पोहण्यासाठी शिर्डी येथील कालिकानगर येथे राहणारे दोन युवक गेले होते.
पोहून झाल्यानंतर दोन्ही युवक साईबाबा प्रसादालयाजवळील असणाऱ्या गोपीनाथ गोंदकर यांच्या विहिरीजवळ आले आणि त्यातील सुरज माणिक जाधव याने पोहता येत नसतांनाही विहिरीत उडी मारली.
आणि 50 फूट खोल असलेल्या विहिरित पोहता न आल्याने पोटात पाणी जावुन युवक पाण्यात बुडाला. त्याचा भाऊ विलास माणिक जाधव याने आरडाओरडा केल्याने
जवळ राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने शिर्डी नगरपंचायत व श्री. साईबाबा संस्थानच्या अग्निशामक पथकाला पाचारण करण्यात आले होते.
अग्निशामक पथकाने येऊन 50 फूट खोल असलेल्या आणि पूर्ण भरलेल्या विहिरित पाणी जास्त असल्याने युवकाला पाण्याबाहेर काढण्यासाठी गळाद्वारे प्रयत्न सुरू केले.
अग्निशामक दलांच्या जवानांच्या तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बुडालेल्या युवकाच्या मृतदेहास बाहेर काढण्यात यश आले.
शिर्डी नगरपंचायत आणि श्री साईबाबा संस्थांनच्या अग्निशामक दलाच्या वतीने मृतदेहास बाहेर काढून शिर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत श्री साईबाबा अग्निशामक दलाचे प्रमुख प्रतापराव जाधव आणि शिर्डी नगरपालिका अग्निशामक दलाचे प्रमुख विलास लासुरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved