कोरोना झाल्यानंतर मुंबईतील ‘ह्या’ हॉटेल मध्ये सुरु आहेत नामदार प्राजक्त तनपुरेंवर उपचार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात आज नव्या ९५ कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २७ हजार २०४ झाली आहे.

दरम्यान कोरोनाची लागण झालेले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे कोरोनातून बरे झाले आहेत. ते कालच श्रीरामपूर तालुक्‍यातील उंबरगाव येथे परतले आहेत. त्यांच्या पत्नी मुलालाही ‘कोरोना झाला होता.

तेही आता बरे आहेत. गेली १५ दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात खा. लोखंडे यांनी उपचार घेतले. सुरुवातीला पाच, सात दिवस आपणास ताप आला होता.तोंडाला चव लागत नव्हती. परतु आता प्रकृती चांगली झाली आहे.

त्यामुळे आपण गावी परतलो असल्याचे खा. लोखंडे यांनी सांगितले. दोनच दिवसापासून राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.त्यांनाही मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.

सध्या मंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोणताही त्रास होत नसून मुंबईतील कोअर सिझन या हॉटेलमध्ये ते उपचार घेत आहेत.

या हॉटेलचा वरचा मजला मुंबई महापालिकेने कोविडच्या रुग्णांसाठी सध्या घेतला आहे.त्यामुळे तनपुरे यांच्यावर इथेच उपचार सुरु आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24