अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- शहरातील महाराष्ट्र बँकेशेजारी असलेल्या डॉ. मोहोरकर कोविड सेंटरला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांनी स्थानिकांचा विरोध असताना आठ दिवसांपूर्वी परवानगी दिली होती.
रविवारी रुग्ण आल्यावर स्थानिकांनी पुन्हा विरोध केला. त्यामुळे डाॅ. पोखर्णा यांनी सेंटर बंद करण्याचे तोंडी आदेश दिले. तथापि, रुग्ण न हलवल्याने नागरिकांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
पोलिसांना पाचारण करण्यात आले. जास्त विरोध होऊ लागल्याने अखेर सेंटर बंद करण्याचे लेखी आदेश देऊन रुग्ण इतरत्र हलवण्यात आले.
शहरातील विनापरवाना व रहिवासी भागात असलेल्या कोविड सेंटरला नागरिकांनी विरोध करत प्रशासनाला निवेदन दिले. विरोध असूनही महाराष्ट्र बँकेशेजारी मोहरकर कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण भरती प्रक्रिया सुरू झाली.
नागरिकांना माहिती मिळताच रात्री १० नंतर तेथे लोक जमा झाले. संबंधित डॉक्टरांना कोविड सेंटर कसे काय चालू केले, अशी विचारणा करत प्रांताधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांना फोनद्वारे कळवण्यात आले.
नागरिक आक्रमक झाल्याचे पाहून जिल्हा शल्यचिकित्सकांनी कोवड सेंटर बंद करण्याचे तोंडी आदेश वैद्यकीय अधीक्षकांना दिले.
तथापि, सेंटर बंद न झाल्याने सोमवारी सकाळी ११ वाजता नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन चालू केले. लेखी आदेश दिल्यानंतर सेंटर बंद करण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved