मतदानानंतर अखेर त्या सरपंचास खुर्चीवरून हटवले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील सरपंचांचा फैसला अखेर आज झाला. गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चांगलाच रंगला होता. संपूर्ण गावात याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर या प्रकरणाचा निकाल आज घोषित झाला आहे.

ग्रामसभेत निर्णय आल्यानंतर चर्चेत आलेल्या म्हैसगावच्या सरपंचपदाचा फैसला अखेर झाला आहे. म्हैसगाव येथे झालेल्या ग्रामसंसदेच्या मतदानात 116 मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला.

अखेर सरपंच महेश गागरे यांच्या विरूद्ध ग्रामसभेने कौल देऊन त्यांना सत्तेवरून पायउतार केले. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला.

एकूण 1526 मतपत्रिका वाटण्यात आल्या होत्या. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी झाली. एकूण १४७९ पैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने ७५६ मतदान झाले.

तर ठरावाच्या विरूद्ध म्हणजेच सरपंच गागरे यांच्या बाजूने ६४० मतदान झाले. ११६ मतांनी अविश्वास ठराव मंजुर झाला. त्यामुळे आता सरपंच गागरे यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24