अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :- यावर्षी गणेशोत्सव आणि मोहरमचा सण सोबत आहेत. गणेशोत्सव आजपासून (22 ऑगस्ट) सुरु होत आहे. मोहरम शुक्रवारपासून (21 ऑगस्ट) सुरु झाला आहे.
गणेशोत्सवामध्ये काढण्यात येणार्या मिरवणुकीला तसेच सवार्यांच्या मिरवणुकीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. गणेश उत्सवाची सांगता 11 दिवसांनी सप्टेंबरमध्ये होणार आहे.
तर मोहरमचे 30 ऑगस्टपर्यंत कार्यक्रम राहणार असून 21 तारखेपासून पाचव्या दिवशी सवार्यांची स्थापना होणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना गणेश मुर्ती स्थापन करण्यासाठी प्रशासनाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी सवार्यांची स्थापना करता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बुधवारी जिल्हा पोलिस मुख्यालयात शांतता गणेश मंडळांचे पदाधिकारी व मोहरम समितीचे पदाधिकारी यांची बैठक घेतली.
या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक सिंह, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपधिकक्षक संदिप मिटके यांच्यासह पोलिस अधिकारी, महसूल अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकार्यांनी मंडळांना सुचना दिल्या आहेत कि, सार्वजनिक गणेश मंडळांना मुर्ती स्थापन करण्यासाठी परवानगी बंधनकारक आहे. मंडप टाकता येणार नाही. तसेच आरत्यांना फक्त पाच जणांनाच प्रवेश द्यावा.
सार्वजनिक मंडळांना फक्त चार फुट उंचीची मुर्ती बसविण्यास परवान आहे. गणेशस्थापनेच्या दिवशी तसेच विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. सार्वजनिक मंडळांसाठी महापालिका एका वाहनाची व्यवस्था करेल.
त्या वाहनामध्ये मुर्ती विसर्जनासाठी द्यायच्या आहेत. या मुर्ती महापालिकेमार्फत एका तलावात विसर्जित करण्यात येणार आहेत. मोहरममध्ये सार्वजनिक ठिकाणी यंदा सवारी स्थापन करण्यास परवानगी देण्यात आली नाही.
नागरिकांनी त्यांच्या घरातच यंदा सवार्यांची स्थापना करायची आहे. तसेच स्थापनेच्या दिवशी विसर्जनच्या दिवशी मिरवणूक काढता येणार नाही. कत्तल की रातही यंदा होणार नाही.
नवसाच्या सवार्यांची मिरवणूक काढण्याबाबत अनेकांनी मागणी केली. नवसाच्या सवार्या दर्शनासाठी नेता येतील मात्र लोकांची गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved