ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात, पती-पत्नीसह चिमुकली ठार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्याच्या हद्दीत कोकमठाण शिवारात क्रुझर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात पती-पत्नीसह एका चिमुकलीचा मृत्यू झाला. या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत.

शुक्रवारी (दि. ३०) पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा गेल्या महिन्यात सुरू झाला. या रस्त्यावर अपघातांची जणू मालिकाच सुरू झाली आहे.

जालना जिल्ह्यातील मंठा गावचे कुटुंब भावाच्या लग्नासाठी विरार येथून जालना येथे मूळगावी आले होते. लग्न झाल्यानंतर मुंबईच्या विरार येथे परतत असताना कोपरगाव तालुक्याच्या हद्दीत कोकमठाण शिवारात जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.

या अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत, तर ७ जण जखमी आहेत. मृतांमध्ये पती संतोष अशोक राठोड( वय ३५), पत्नी वर्षा संतोष राठोड (वय २९) आणि मुलगी अवनी संतोष राठोड (वय १८ महिने) अशी मयतांची नावे आहेत.

जीपने टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की जीपच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. जखमींना येथील आत्मा मलीक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. संतोष राठोड व मुलगी अवनी या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी वर्षा राठोड यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Ahmednagarlive24 Office