अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmadnagar breaking

Ahmednagar News : पैठण उजव्या कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. अण्णा लक्ष्मण गायकवाड (वय २२), रा. हातगाव, ता. शेवगाव, असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब गर्जे यांनी कालव्यातून काढलेला मृतदेह शेवगावला उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

त्या नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देऊन मृतदेहाचा अंत्यविधी करण्यात आला आहे. गरीब कुटुंबातील समवेत काही दिवस कांबी येथे जाऊन मजूर म्हणून विहिरीचे काम केले,

नंतर हातगावला आपल्या घरी परतत असताना उन्हामुळे जवळच असलेल्या पैठण उजवा कालव्यातून अंघोळ करण्यासाठी गेला असता, पाय घसरून कालव्यात पडला.

त्याचा शोध घेऊनही तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडल्याने मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत शेवगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe