अहमदनगर ब्रेकिंग : उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar Breaking : शहरातील उड्डाणपुलावर पुन्हा एकदा दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात पतीचा उड्डाणपुलावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना स्टेट बँक चौक ते चांदणी चौक दरम्यान घडली.

किशोर जिजाबा गायकवाड (रा.तुरवली, ता. इंदापूर, जि.पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी चित्रा जखमी झाली असून तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पती-पत्नी हे त्यांच्या दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगरहून पुण्याच्या दिशेने जात होते. नगरमधील उड्डाणपुलावरून जाताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी कठड्याला घसरून चालक पुलावरून खाली पडला.

मृत्यू झाला असून त्याची स्त्रीच जखमी झाली. या अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिकांसह प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, उड्डाणपुलावर दुचाकींचे वाढते अपघात चिंताजनक बाब बनली आहे.