Ahmadnagar Breaking : सोनई पोलीस ठाण्याने हद्दपार केलेला आरोपी नितीन शिरसाट हा परिसरात सापडल्याने त्यास काल मंगळवारी सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले.सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की,
सोनई पोलीस ठाण्याच्या परीसरात हद्दपार असलेला आरोपी नितीन विलास शिरसाट ( रा. वांजोळी शिवार, ता. नेवासा) हा कोणाची पूर्व परवानगी न घेता त्याच्या राहत्या घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने
सोनई पोलीस ठाण्याच्या पथकाने वांजोळी शिवार येथे जाऊन त्यास कोणाच्या पूर्व परवानगीने हद्दीत परत आला याची विचारणा केली असता, त्याने पथकाला उडवा उडवीचे उत्तर दिल्याने नितीन शिरसाट यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पुढील तपास पोलीस नाईक सोमनाथ झांबरे हे करत आहे. आरोपी नितीन शिरसाट याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला,
अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात, पो. कॉन्स्टेबल सुनील पालवे, विठ्ठल थोरात, महिला पो. कॉन्स्टेबल मनीषा नरोटे यांनी केली.