ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar breaking : मागील अनेक दिवसांपासून शिबलापूर-पानोडी शिवारात बिबट्या धूमाकूळ घालत आहेत. त्यामुळे ८ दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात एक वर्ष वयाचे आणि नर जातीचे बिबट्याचे बछडे नुकतेच जेरबंद झाले.

तर याच परिसरात एक मादी बिबट्या व तिचे आणखी दोन बछडे आहे. त्यामुळे वनविभागाने सर्तकपणे मादी बिबट्याला जेरबंद करावे, अन्यथा मादी बिबट्याकडून धूमाकूळ घातला जाण्याची शक्यतेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिबलापूर हद्दीत व पानोडी शिवानजीक असलेल्या काळूबाई ओढ्याजवळ दत्तू काशीनाथ नांगरे यांची वस्ती आहे. मागील अनेक दिवसांपासून मादी बिबट्याचा तिच्या तीन बछड्यासमवेत याठिकाणी वावर वाढला होता.

त्यामुळे दहशतीखाली असलेल्या नांगरे कुटुंबाने ही माहिती वनविभागाला कळवत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. त्यासाठी वेळोवेळी सरपंच प्रमोद बोंद्रे आणि प्रवीण खेडकर यांनी पिंजरा लावण्यासाठी पाठपुरावा केला होता.

त्यामुळे ८ दिवसांपूर्वी याठिकाणी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात एका बाजूला कुत्रा बांधून ठेवला होता.काल मंगळवारी (दि.२०) पहाटे भक्ष्याच्या शोधात असलेले बिबट्याचे बछडे पिंजऱ्यात जेरबंद झाले.

त्यामुळे संतप्त मादी बिबट्याकडून परिसरात दहशत निर्माण केली जाण्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली असून आणखी पिंजरे लावून मादी बिबट्यासह तिचे बछडे जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, नागरे वस्तीसह परिसरातील नागरिकांनी लहान मुलांसह स्वतः ची काळजी घ्यावी, असे सांगून रात्री अपरात्री घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन वनाधिकारी सुहास उपासनी आणि हरिचंद्र जोजार यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office