Ahmadnagar Breaking : कर्जत येथील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या युवतीने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
सदर घटनेबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१५ रोजी सकाळी कर्जत येथील बुवासाहेब नगर परिसरात खाजगी इमारतीमध्ये राहत असलेल्या वैष्णवी शिवाजी खिळे (वय २० वर्षे,)
रा. कानडी बुद्रुक, ता. आष्टी, जि. बीड या विद्यार्थिनीने आपण राहत असलेल्या रूममध्येच ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
याबाबत वस्तीगृह मालकाने दिलेल्या खबरीवरून कर्जत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे हे करीत आहेत.
सदर मुलीचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो लॉक असल्याने अनलॉक करण्यासाठी पाठविण्यात आला असून, त्यानंतर या मुलीने कधी कुणाशी संपर्क केला होता हे समजू शकणार असून पुढील तपासला दिशा मिळणार आहे.