ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : मायलेकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मनीषा संदीप नरवडे (वय ३५) व ओमकार संदीप नरवडे (वय १०), या मायलेकाने त्यांच्या शेताजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तिसगावमध्ये मायलेकाने आत्महत्या केल्याची घटना समजल्यानंतर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गारुडकर वस्ती जवळील विहिरीजवळ पोहोचले. मायलेकाचे मृतदेह पाण्यात तरंगताना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.

नरवडे कुटुंबातील मायलेकाने आत्महत्या का केली, याचे कारण समजले नाही. पाथर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी बुधवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मयत मनीषा नरवडे व ओमकार नरवडे याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला

पुढे शवविच्छेदनासाठी पाथर्डीला रवाना करण्यात आला. अतिशय गरीब कुटुंबातील या मायलेकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने तिसगावसह परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office