अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदाबाद येथे एका महागड्या पोर्शे स्पोर्ट्स कारच्या मालकाला वाहतूक पोलिसांनी तब्बल 27 लाखांचा दंड ठोठावला आहे. देशातील सर्वाधिक दंडाची ही रक्कम आहे.
या कारचे कागदपत्रे, नंबर प्लेट नसल्याने अहमदाबाद पोलिसांनी गाडी जप्त केली होती. त्यानंतर कार मालकाने टॅक्स, दंड आणि व्याजाची रक्कम भरुन गाडी सोडवली आहे.
दरम्यान या कार मालकाला आपली कार वाहतूक पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तब्बल 27.68 लाख रुपयांचा दंड भलावा लागला आहे. या गाडीचे कागदपत्र नसल्याने गाडी जप्त केली होती.
याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले की, गाडीची नंबर प्लेट नसल्याने आणि कागदपत्रे सुद्धा नसल्याने आम्ही गाडी जप्त केली.
त्यानंतर मोटर वाहन कायद्यानुसार, कार मालकाला दंड ठोठावला. यानंतर आता कार चालकाने दंडाची रक्कम भरली असून गाडी सोडवली आहे.