अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने हे आमदार झाले होम क्वारंटाइन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झालेला आहे. यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा 500 च्या पुढे निघून गेला आहे.

गुरूवारी बाधित आढळलेल्या रुग्णांत नगर शहर १, श्रीरामपूर ५, पेमरेवाडी (संगमनेर) १, दाढ बुद्रूक (राहाता) १, तसेच भिंगार येथील १ रुग्णाचा समावेश आहे.

श्रीरामपूरमध्ये कोरोनाबाधित अधिकाऱ्यांच्या संपर्कातील पाचजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली. अन्य अकरा जणांचे अहवाल निगेटिव्ह असून अद्याप २० अहवाल प्रतीक्षेत आहे.

दरम्यान, कोरोनाबाधित अधिकाऱ्यासमवेत बैठकीला उपस्थित असलेले श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. ते कोरोना चाचणी करून घेणार असल्याचे समजते.

संबंधित अधिकाऱ्याने गेल्या आठवड्यात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. त्यातील काही अधिकारी स्वत:हून स्त्राव देण्यासाठी आले.

अकोले एक, मनमाड एक, शिर्डी एक, संगमनेर दोन, बाभळेश्वर एक येथील उपस्थित अधिकाऱ्यांची माहिती त्या-त्या आरोग्य केंद्राला कळवण्यात आली आहे.

जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६२ इतकी झाली आहे. नव्याने बाधित आढळलेले सर्व रुग्ण यापूर्वीच्या रुग्णांच्या संपर्कातील आहेत. जिल्ह्यातील ५८ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. एकूण रुग्णसंख्या ५०९ झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24