अहमदनगर ब्रेकिंग : कारच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-मोटारसायकलने जाणाऱ्या दोघांना मागून येणार्‍या स्विफ्ट गाडीने जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे मोटारसायकलस्वार ठार झाले आहेत.

ही दुर्दैवी घटना दौंड-नगर रोडवर चिखली बसस्टॉपसमोर काल सोमवार रोजी ११ वाजता घडली. याबाबतची अधिक माहिती अशी कि, सुनील गंगाराम बुलाखे, वय ४५ घ दादाभाऊ खंडू बुलाखे हे दोघे आपल्या मोटारसायकलवरुन दोंड- ते नगर रोडने काल सकाळी ११ च्या सुमारास जात होते.

त्याचवेळी दौंड ते नगर जाणारी स्वीप्ट गाडी नं. एमएच १६ बीझेड ३१३७ या कारने बुलाखे यांच्या मोटारसायकलला चिखली बसस्टॉपसमोर पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेमुळे मोटारसायकलसह दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या गंभीर अपघातात दादाभाऊ बुलाखे व सुनील हे दोघेही रक्तभंबाळ होवुन नंतर गंभीर जखमी होवून नंतर त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत रावसाहेब खंडू बुलाखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोनि माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोना पठारे हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24