अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : आज अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या 223 झाली आहे.
संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण. मदिनानगर येथील तेवीस वर्षीय महिला बाधित. पुनानाका नाईकवाडपुरा येथील ३५ वर्षीय व्यक्ती बाधित.
यापूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने लागण. मदिना नगर येथील ५२ वर्षीय व्यक्तीला लागण. सदर व्यक्ती ड्रायव्हर म्हणून काम करत असून तो बंगळूरू येथून आला होता.
राहाता तालुक्यातील दोघेजण कोरोना बाधित. लिमगाव निघोज येथील २३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह. राहाता शहरातील बोठे गल्ली येथील ३६ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित.
नगर शहरातील पाचपीर चावडी माळीवाडा येथील एकूण ६९ वर्षीय व्यक्ती बाधित. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews