अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-10 कोटी 20 लाख 25 हजार 510 रुपयांची कॅन्टोन्मेंट बोर्डाचे वाहन प्रवेश कराची करारभंग करून अनाधिकाराने वसुली करून अपहार करून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हा गुन्हा विकी चंद्रलाल लालवानी (रा हेमू कॉलनी गार्डन जवळ प्लॉट /327 पिंपरी, पुणे ) यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, 10,20,25,510/- रुपये फसवणुकीचे इराद्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या न भरता
तसेच मेसर्स ओमकार कन्स्ट्रक्शनचे मालक प्रोप्रायटर पिलोक सिंग खडक सिंग रावल हे दिनांक 11/09/2015 रोजी मयत झालेली असतानाही आरोपी याने सदर बाबत कॅन्टोनमेंट बोर्ड माहिती न देता
सदरचे मुखत्यारपत्र हे संपुष्टात आल्यानंतर ही त्या मुखत्यार पत्रा चा वापर करून ते अस्तित्वात आहे असे भासवून आरोपी मजकूर याने दि. 11/09/2015 ते दिनांक 30/06/2016 पर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे वाहन प्रवेश कराचे अना अधिकाराने वसुली करून करार भंग करून अपहार केला आहे
व कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक फसवणूक केली आहे, अशी फिर्याद शिशिर बाळकृष्ण पाटसकर (वय 42 व्यवसाय नोकरी वरिष्ठ राजस्व लिपिक कॅन्टोन्मेंट बोर्ड भिंगार ) यांनी भिंगार पोलिस ठाण्यात दिली.
या फिर्यादीवरून गुन्हा क्र व कलम : गुरनं 13/2021 भादवि 420, 406, 409, 465, 467, 468, 471 प्रमाणे विकी चंद्रलाल लालवानी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत