अहमदनगर ब्रेकिंग : तिहेरी अपघात होऊन ३ लहान मुलांसह १० जण जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- पुणतांबे रस्त्यावर गोंडेगावनजीक पिकअप, इंडिका व्हिस्टा आणि टीव्हीएस स्टार मोटारसायकलीचा शनिवारी तिहेरी अपघात होऊन ३ लहान मुलांसह १० जण जखमी झाले.

नेवासे येथील इंडिका (एमएच १३ एक्यू ०२३३) श्रीरामपूरहून पुणतांब्याकडे जात होती. कारमध्ये सात प्रवासी होते. टीव्हीएस स्टार (एम एच १७ सीके ८८८४) मोटारसायकलीवर दोन महिला व एक पुरुष असे इंडिकाच्या पाठीमागून येत होते.

त्याचवेळी महिंद्र पिकअप (एमएच ३९ डब्लू ०१६८) धुळे येथून शेंगदाणे घेऊन कोपरगावमार्गे श्रीरामपूरला जात होती. गोंडेगावच्या पुढे इंडिका व पिकअपची धडक झाली.

मागची मोटारसायकलह इंडिकावर धडकली.या अपघातात मोटारसायकलीवरील दोन महिलांसह चालक गंभीर जखमी झाला. इंडिका कार व पीकअपमधील तीन लहान बालकांसह एकूण दहा प्रवासी जखमी झाल्याचे समजले.

पोलिसांनी क्रेनने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मोटारसायकलीवरील तीन जखमींना श्रीरामपुरात साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24