अहमदनगर ब्रेकिंग : १५ कोरोना संशयीत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेर शहरातील १४ व तालुक्यातील एक असे एकूण १५ नागरिक आल्याने खळबळ उडाली आहे.

ही बाब समोर येताच सोमवारी प्रशासनाने तत्काळ या पंधरा संशयितांना ताब्यात घेत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.

रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी नागरिकांना जाण्यास व येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली.

जिल्ह्यात रविवारी दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याने त्यांच्या संपर्कातील ०९ व्यक्तीचे स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते.

त्या ०९ अहवालासह एकूण २३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आता जिल्ह्यातील विविध भागातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून

नेवासे, संगमनेर, राहुरी, जामखेड आदी ठिकाणाहून ४९ जणांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

त्यांचे घशातील स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.

या ४९ व्यक्तीमध्ये नेवासेमधून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीमध्ये काही परदेशी व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकरी राहुल द्विवेदी यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24