अहमदनगर ब्रेकिंग : १९ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ;- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेले १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत,

अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. या व्यक्ती जामखेड, नगर, नेवासा, कोपरगाव, पारनेर येथील असल्याचे त्यांनी सांगितले.

या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

अठरा जण ‘करोना’मुक्त

जिल्ह्यात आतापर्यंत ३१ करोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यापैकी तब्बल १८ रुग्णांनी ‘करोना’वर मात केली आहे.

यामध्ये १७ जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून एकाला हॉस्पिटलमध्येच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

तर, कोपरगाव व जामखेड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यु झाला आहे. उर्वरीत ११ रुग्णांवर ‘आयसोलेशन वार्ड’मध्ये उपचार सुरू आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24